Search

मानसिक लवचिकता - Resilience

आपल्या सर्वांना माहितच आहे की मानसिक लवचिकता (रेसिलिअन्स / resilience) हा यशप्राप्तीचा महत्वपूर्ण आधारस्तंभ आहे. मानसिक दृष्ट्या लवचिक व्यक्ती हे अनेक संकटांचा सामना आनंदानी करत त्यातून बाहेर पडून स्वतःची वाढ पण करून घेतात.


जेव्हा आपण मानसिकदृष्ट्या कणखर व्यक्ती बद्दल विचार करतो, तेव्हा आपल्याला स्थिरतेचा विचार येतो, आपल्याला अनेक प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढणाऱ्या व्यक्तीचा विचार येतो. पण खरोखर मानसिक लवचिकपणा म्हणजे काय? ही गुणवत्ता असलेले व्यक्तीमत्व घेऊन लोकांचा जन्म होतो असे नाही, आपण सर्वजण लवचिकतेकडे एक अशी गुणवत्ता की जी वर्षानुवर्षे अडचणींवर मात करून आणि कोणत्याही प्रतिकूल परिस्थिती मध्ये 'नाही' न बोलण्याच्या वृत्तीद्वारे तयार झाली आहे अशा अनुशंघाने बघतो!

पण एवढेच नाही! मानसिक लवचिकता ही पुढील घटकांवर अवलंबून असते.

  • आशावाद - तणावाचा एखाद्या व्यक्तीवर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कसा प्रभाव होतो हे ठरवणार घटक म्हणजे आशावाद. आत्तापर्यंतच्या संशोधनांमधून हे दिसून आले आहे की आशावाद ताणतणाव याला जवळजवळ ५०% नी कमी करू शकतो. आपल्याला लक्षात आलेच असेल हा केवढा मोठा बदल आहे! यामुळे केवळ लोकांची एकूणच कार्यक्षमता सुधारत नाही तर संपूर्ण ताणतणाव कमी झाल्याने, त्यांच्यावर ताणाचा प्रतिकूल-परिणाम कमी होते, आणि त्यामुळे भविष्यातील त्यांचे 'ब्रेकडाउन' म्हणजे नैराश्याने येणारी निर्बलता कमी होते.

  • सामाजिक संबंध - हे खूप महत्त्वाचे आहे! आपल्याला असे दिसते की आजकाल बरेच लोक आपली करिअर पुढे आणण्यासाठी अर्थपूर्ण सामाजिक संबंधांमध्ये भाग घेणं टाळतात किंबहुना त्यामुळे त्यांचा वेळ वाया जाणार नाही. परंतु कमीतकमी १ अर्थपूर्ण नातेसंबंध असणे महत्वाचे. एक नातेसंबंध ज्यामध्ये आपण समोरील व्यक्तीवर पूर्णपणे अवलंबून राहून त्यांच्यावर विश्वास ठेवूशकू अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात असणे आपल्याला जास्त प्रबळ बनवते. (आणि ही केवळ सांगण्याची गोष्ट नसून संशोधकांनी वैज्ञानिकद्रुष्ट्या सिद्ध करून दाखवली आहे)

  • प्रेम - आपल्याला प्राप्त होणारे प्रेम आणि आजूबाजूस असलेल्या व्यक्तींचा आधार हे प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक लवचिकतेवर प्रभाव करतात. ज्यांच्या पालकांकडून त्यांना अधिक प्रेम आधार मिळतो ती मुलं त्यांच्या प्रौढ आयुष्यात जास्त लवचिकता दाखवतात.


मानसिक लवचिकता आपल्याला काय देते?

  • मानसिक लवचिकता आपली यशस्वी होण्याची शक्यता वाढवते

  • मानसिकद्रुष्ट्या लवचिक असणारी व्यक्ती चांगले पैसे कमवते

  • मानसिकद्रुष्ट्या लवचिक असणारे लोक ताणतणावाचा जास्त चांगल्या प्रकारे सामना करू शकतात

  • मानसिकद्रुष्ट्या लवचिक असणारे लोक अधिक निरोगी असतात आणि आजारातून लवकर बरे होतात. तया व्यक्तींमध्ये वैद्यकीयदृष्ट्या गंभीर संकटामध्ये किव्हा आजारामध्ये जगण्याचे प्रमाण देखील अधिक चांगले आहे.

  • मानसिक समस्यांमधून बाहेर पाडण्यासाठी त्यांना कमी वेळ लागतो

आपण सर्वच मानसिक लवचिकता वाढवू शकतो! लवचिकतेस प्राप्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तणावास सक्रियपणे सामोरी जाणे. यामध्ये समस्यांना सामोरे जाण्यासाठी मानसिक आरोग्यास पोषक असे मार्ग निवडणे, प्रतिकूल प्रसंगांना सोडविण्यासाठी उपाय शोधणे आणि त्यांची अंमलबाजवणी करणे हे महत्वाचे घटक आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे मानसिक तणावाला सामोरी न जाणे तसेच त्रासदायी प्रसंगांकडे दुर्लक्ष करणे या सवयीमुळे प्रत्यक्षपणे मानसिक लवचिकता कमी होते आणि अधिक ताण निर्माण होतो.

ओंकार नाईक हे पुण्यातील एक मानसिक आरोग्य समुपदेशक आहेत.

ते त्यांच्या कंपनी (CINQ IN) मधून विवीध प्रकारचे मानसिक आरोग्यास प्रोत्सहान देणारे कार्यक्रम राबवतात. तसेच त्यांची कंपनी ही मानसिक आरोग्य या कार्यक्षेत्रात नवीन शिरलेल्या व्यक्तीसाठी किंवा मानसिक आरोग्य या विषयक पदवी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व ट्रैनिंग साठी विविध कार्यक्रम राबवते.


www.cinq.co.in

41 views0 comments